पंढरपूर ,( प्रतिनिधी ) - पंढरपूर येथील भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने माता रमाई यांची जयंती विविध उपक्रम राबवुन साजरी करण्यात आली. यात १९७ / ब, बौध्द नगर येथील माता-भगिणींना सन्मानीत करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांना कुंकवाचे करंडे भेटस्वरुपात देण्यात आले.माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. यासह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर दंदाडे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रेरणादायी ठरेल असं मौलीक काम जर कोणी केलं असेल तर ते माता रमाई यांनी केलेलं आहे. माता रमाई यांनी महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या प्रवाहाविरुध्दच्या व समाजाच्या हितासाठीच्या लढयात आपल्या प्रापंचिक अडी-अडचणी येवु दिल्या नाहीत.परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणार्‍या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.सरपणासाठी वणवण फिरल्या. मुलांसाठी उपास करत असत.रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. असं त्यांचं कार्य व त्यांनी केलेला त्याग हा आजच्या युगातील प्रत्येक माता-भगिणींसाठी प्रेरक आणि स्फुर्तीदायक ठरणारा आहे. यासाठी आपण सर्वांनी माता रमाईचा इतिहास व त्यांचं कार्य जाणुन घेणं अत्यावश्यक आहे, असं मत किशोर दंदाडे यांनी यावेळी व्यक्त केलं.
 
Top