फोटो ओळ - आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात महाड शहर पोलिसांचे स्वागत करताना गृहपाल संदीप कदम, जयपाल पाटील  
(छाया-विकास रणपिसे)
अलिबाग - सध्याच्या जीवनात मोबाईल वापरणे अतिशय गरजेचे आहे. आपण सारे कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी आहात. वसतीगृहात आल्या वर आपला मोबाईल चार्जींगला ठेवून आपले आई-वडील,भाउ-बहिण,मित्र-मैत्रिणीसोबत कधीही, केव्हाही मोबाईलचा वापर करु नये. कारण आपल्या हाताची बोटे, मुलींचे गाल येथे त्याचा स्पोट झाल्याने आपल्यावर सुध्दा आपत्ती येवून अपघात होवू शकतो. यासाठी ही काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण खात्याच्या महाड वसतीगृहातील मुला-मुलींसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात रायगड भूषण आपत्ती व सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी सांगितले. यावेळी १५० विद्यार्थी व २० कर्मचारी उपस्थित होते. 

व्यासपिठावर मुलांच्या वसतीगृहाचे गृहपाल संदीप कदम, मुलींच्या वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती सावंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे ग्रंथपाल उपस्थित होते. प्रारंभ जयपाल पाटील यांनी ५० हजार नागरीकांना प्रशिक्षण दिल्याचे सांगून कदम यांनी त्यांचा सत्कार करुन प्रास्ताविक केले. 

यावेळी देशात नव्याने वाहनकायदा झाल्याने त्याची माहिती देवून परवाना नसल्यास वाहने चालविल्याने कोणते नुकसान होते याची माहिती दिली. उपस्थितांमध्ये २० मुलांकडे वाहन परवाना नसताना ते गाड्या चालवितात हे माहित पडले. 

    यानंतर महाराष्ट्र शासनाचा आपत्ती कायदा २००५ , २००७ व विंचू चावल्यावर करण्यात येणारा प्रथमोपचार, अपघात प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा याची माहिती देवून मुलींना आपल्या सुरक्षेसाठी सूचना देताना पोलिसांची मदत कशी घ्यायची यासाठी महाड शहर पोलिस ठाण्याचे हवालदार पाटील कार्यक्रमस्थळी आले होते . मुला-मुलींना आपत्ती व्यवस्थापनाबरोबर शासकीय अधिकारी बना असा सल्ला देवून आपत्तीप्रसंगी त्वरीत इतरांना मदत करा. त्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनाकडून बक्षिसही मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.     आभार गृहपाल श्रीमती सावंत यांनी मानले. 
 
Top