पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहात सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन शैलेश आगावणे यांचे शुभहस्ते व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महाराजाच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.  चर्मकार समाजाच्या काही मागण्या मांडण्यात आल्या.
 यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सचिन शिंदे, नगरसेवक विक्रम शिरसट,नगरसेवक गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक राजु सर्वगोड,नगरसेवक डी.राज.सर्वगोड, नगरसेवक विवेक परदेशी,माजी नगरसेवक दिंगबर पवार,बसपाचे भालचंद्र कांबळे, आबासाहेब आगावणे आदी उपस्थित होते.
 
Top