पंढरपूर - श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी, पंढरपूर येथे महर्षि वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्यावतीने पंढरपूर नगर परिषदेचे नूतन उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, पाणी पुरवठा सभापती अँड गुरुदास अभ्यंकर, शिक्षण समिती सभापती सौ रेणूकाताई घोडके, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, महिला बालकल्याण सभापती सौ.रेहानाताई बोहरी व नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांचा सत्कार सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते करण्यात आला. तसेच श्री पुंडलिक देवस्थान ट्रस्टचे नूतन विश्वस्त, ट्रस्टचे उपाध्यक्ष अनिल ज्योतीराम अभंगराव, सचिव उमेश संगितराव, श्रीमंत परचंडे, आबासो नेहतराव, मनोज प्रभाकर अधटराव यांचा व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोळी समाजातील इयत्ता १० वीच्या दहा होतकरू विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्डाची परिक्षा फी रुपये ५००/ची शिष्यवृत्ती कोळी समाजातील सेवानिवृत्त अधिकारी हणुमंतराव माने, मोहनराव अभंगराव यांच्या मदतीतून देण्यात आली.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक यांनी सत्कारार्थींना शुभेच्छा देताना श्री पुंडलिक मंदिर, व महादेवांची प्राचीन मदिंरे हि पंढरपूरची ओळख आहेत तसेच चंद्रभागेची स्वच्छता व पावित्र्य राखणे हे पूजारी म्हणून कोळी समाजाचे कर्तव्य व अधिकार आहेत त्यामुळे देवस्थान ट्रस्टच्या नूतन विश्वस्तांनी शासनाच्या व धर्मादाय आयुत्काच्या नियमानुसार तुम्ही काटकसरीने व येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी व समाधानकारक दर्शन द्यावे, दरवर्षी संस्थेने ऑडीट करून भाविकां कडून स्वेच्छेने मिळणाऱ्या मिळणाऱ्या देणगीचा विनियोग मंदिर व्यवस्थापनावर विश्वस्त म्हणून प्रामाणिकपणे करावा असे सांगताना आम्ही नगरपरिषदेच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील अनेक विकासाची व नागरी सुविधासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून गेली अनेक वर्षे कामे मार्गी लावत आहोत. आगामी २५ वर्षाची पंढरपूरच्या लोकसंख्या गृहीत धरून रस्ते, पाणी, व आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत. नगराध्यक्ष व इतर पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवकांनी विकासकामाबाबत दक्ष राहून संबधित कामे उत्तम व चांगल्या दर्जाची करुन घ्यावीत अशी सूचना केली व नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव व माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांनी मनोगत व्यक्त करुन संयोजकाचे आभार मानले. 
 कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सुरेश शिंदे सर, खडाखडे साहेब, भिमराव अधटराव व  सहकाऱ्यांनी केले होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश अधटराव तसेच माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,नगरसेविका सौ.भाग्यश्रीताई शिंदे , सचिन शिंदे तसेच महादेव कोळी समाजाचे कर्मचारी ,परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top