पंढरपूर-- पंढरपूर शहरांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून येथील गांधी रोड वर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
प्रतिमेच्या पूजनानंतर पारंपारिक पद्धतीने काढली जाणारी शिवछत्रपतींची पालखी सोहळा सकाळी दहा वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. हा पालखी सोहळा शहरातील गांधी रोड,चौफळा , शिवाजी चौक ,सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, भोसले चौक ,अर्बन बँक, भादुले चौक ,नाथ चौक पुन्हा गांधी रोड या मार्गावरून काढण्यात येणार असून या पालखी सोहळ्यात शिवकालीन मर्दानी खेळ, झांजपथक, लेझीम पथक, मा साहेब जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लहान मुलांचे पथक ,पालखी सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. यावेळी मराठा समाजातील सर्वजण सहपरिवार सहभागी होऊन महिला पारंपरिक वेशभूषेत तर पुरुष पांढरा पोशाखा मध्ये सहभागी होणार आहेत. 
यानंतर सर्व वर्गातील स्पर्धकांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कराटे स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून यामध्ये समाजातील जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले आहे. 
  मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे समिती नुकतीच स्थापन करण्यात आली असून अध्यक्ष स्थानी श्रीकांत चव्हाण, उपाध्यक्ष सोमनाथ झेंड, सचिव पांडू शिंदे ,खजिनदार सचिन गंगथडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून मिरवणूक प्रमुख म्हणून सागर सावंत, पालखी सोहळा प्रमुख समाजातील युवती व महिला यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासाठी डॉक्टर संगीता पाटील, प्राजक्ता शिंदे, रजनी जाधव, प्रभावती गायकवाड, आश्विनी शिंदे, रतन थोरवत, अश्विनी साळुंखे ,अर्चना यादव, मैना गंगथडे, स्नेहल पवार ,अर्चना गायकवाड यांच्यावर जबाबदारी राहणार आहे . शिवजन्मोत्सवसाठी नागेश गायकवाड, प्रणव गायकवाड, लखन चव्हाण,जीवन गायकवाड , बालाजी चव्हाण, संतोष थिटे, अविनाश जक्कल, प्रशांत नागणे, महेश उंबरकर, विशाल सुरवसे, शिवाजी मोरे, विजय बंडगर हे काम पाहणार असून या सर्वांच्या निवडी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली किरण भोसले, संतोष जाधव सर, अमोल पवार, संतोष जाधव, राजेंद्र गिड्डे  संतोष गंगथडे, सावंत सर यांच्या उपस्थितीत सर्वानुमते करण्यात आली असून या सोहळ्यासाठी समाज बांधव समाज भगिनी शिवप्रेमी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे
 
Top