पंढरपूर - विठ्ठल-रुक्मिणी हे देशातील आराध्य दैवत असून या पंढरपूर शहरामध्ये अवैध वाळू वाहतूक होत असल्यामुळे चंद्रभागा नदीची अवस्था बिकट होत चालली आहे . याबाबत वारकरी संप्रदायाकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.रेल्वे पूल ,जॅकवेल बंधारा काही अंतरावर झोपडपट्टीमधून ,कुंभार गल्ली इसबावी येथून दिवस-रात्र पंढरपूर शहर हद्दीतून वाळूवाल्यांचा धंदा जोमात आहे. विविध मार्गाने वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. 
आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या पात्रात आंघोळीला गेलेल्या विनोद गायकवाड, गाव पळसा ,तालुका हादगाव, जिल्हा नांदेड या भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत बुडून मृत्यू झाला याला कारण वाळू उपसा असल्याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. अशा घटना वारंवार घडत आहेत

एका विवाह सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आलेला विनोद गायकवाड ,वय अंदाजे २५, हा तरूण चंद्रभागेच्या पात्रात पोहत होता. पाण्याबाहेर येताना मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्याने एका खड्डयात बुडून तो मयत झाला.

या तरूणाचा मृतदेह कोळी समाजातील सुरज कांबळे, सुनील कोताळकर,वैभव माने,ओंकार संगीतराव,विठ्ठल करकमकर,नानासाहेब करकमकर यांनी बाहेर काढला. तरूणाचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.
 
Top