नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)- आडवद, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषद शिक्षक उमेश अशोक बाविस्कर यांना बीएड या परीक्षेत विद्यापीठात द्वितीय आल्याबद्दल मुख्य अतिथी फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे व दूरदर्शन (भारत सरकार) चे प्रमुख डॉ.भुपेंद्र कैथोला तसेच इगणू पुणेचे डायरेक्टर एम. पार्थसारथी व मुंबई इगणू चे प्रमुख डॉ.कृष्णमूर्ती यांच्या हस्ते बीएड पदवी विशेष प्राविण्याने (विद्यापीठात द्वितीय) उत्तीर्ण झाल्यामुळे सत्कार करून प्रदान करण्यात आला. 
  त्यांच्या निवडीबद्दल दिनेश शेटे, नरेंद्र जाधव , प्रकाश जाधव ,सचिन थोरात, दिपाली थोरात यांनी अभिनंदन केले.
 
Top