खर्डी, (अमोल कुलकर्णी) - पंढरपूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून पुढे आलेले पंढरपूर-सातारा रस्त्यालगत असलेल्या जैनवाडी गावामधील नागरीकांमध्ये कायमस्वरुपी सामाजिक सलाखो राखला जावा, तरुण पिढीने राष्ट्रपुरुषांचा आर्दश नजरेसमोर ठेवून भविष्याची वाटचाल करावी अशा अनेक उद्देशांनी प्रेरीत झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतुन तब्बल २० फुट उंच,५० फुट लांब व ३० फुट रुंदी असलेला ऐतिहासिक बुरुज उभारण्याचे काम हाती घेतले असून शिव जयंतीच्या निमित्ताने त्याची पायभरणी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.दिपक पवार यांनी दिली.


जैनवाडी या गावाने राज्यशासनासह केंद्रशासनाचे अनेक पुरस्कार मिळवले असल्यामुळे आर्दश, स्वच्छ,सुंदर गाव म्हणून गावाचा नावलौकिक झाला आहे.तंटामुक्त समितीच्या स्थापनेपासून ते आजतागायत गावात समितीचा एकच अध्यक्ष राहीलेला आहे. यंदाच्या वर्षी कोणताही वायफट खर्च न करता सामाजिक सलोखा व भावी पिढीला प्रेरणा देणारी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला.छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यानंतर ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या आधुनिक व्यायाम शाळेचे व लोकवर्गणीतुन उभारलेल्या जिल्हा परीषदेच्या शाळेतील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रवेशद्वाराजवळ चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी तेथे ऐतिहासिक  बुरुज उभारण्यात येणार असून त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलेे.या बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता आहिल्यादेवी होळकर,भगवान महावीर व भगवान गौतमबुद्ध यांचे पुतळे बसवण्यात येणार असून हे सर्व काम लोकवर्गणी व लोकसह भागातून करण्यात येत असून त्यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभत आहे.इतिहासातील राष्ट्र पुरुषांचे पुतळे हे भावी पिढीसाठी ऐतिहासिक ठेवा असतात त्यांच्यापासून आत्मविश्‍वास व प्रेरणा मिळत असते.त्यामुळे ऐतिहासिक बुरुज उभारण्याचा निर्णय गावातील तरुणाईने घेतला त्यास ग्रामस्थांनी एकमताने साथ दिली असे अ‍ॅॅड.दिपक पवार यांनी सांगितले आहे.  
याप्रसंगी शिवप्रेमी गृप व दिपकदादा पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top