पंढरपूर – “रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. महेंद्र गजधाने यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठाने नुकतीच अर्थशास्त्र विषयाची पी.एच. डी.पदवी प्रदान केली आहे.त्यांनी अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सोलापूर जिल्ह्यातील विशेष घटक योजनेचे मूल्यमापन’ या विषयावर पीएच.डी.चे संशोधन केले आहे. मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ.संतोष कदम यांनी त्यांना मार्गदर्शन केले. 
       डॉ.महेंद्र गजधाने यांच्या या यशाबद्दल पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक भोईटे,प्राचार्य डॉ.जे.जी.जाधव,प्राचार्य डॉ.डी.जी.साळुंखे,प्राचार्य डॉ.बी.एम.भांजे व सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. 
डॉ. महेंद्र गजधाने यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून संशोधन पेपर सादर केले आहेत. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमधून संशोधन पेपर प्रकाशित केले आहे. गजधाने यांच्या या यशाबद्दल महा विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. पी.एच.डी. पदवीमुळे डॉ. महेंद्र गजधाने यांच्या संशोधन कार्यास विशेष मान्यता प्राप्त झाली आहे. 
 
Top