पंढरपूर येथे महसूल व पोलीस
प्रशासनाच्या वतीने केलेल्या कारवाईत २० क्विंटल तांदूळ व चार क्विंटल गहू असा
एकूण २४ क्विंटल धान्य साठा जप्त केला आहे.
हा धान्य साठा शासकीय
गोदाम, पंढरपूर येथे ठेवण्यात आलेला आहे.
लिलावात भाग
घेण्यासाठी तीन हजार रुपये अनामत रक्कम
भरणे आवश्यक आहे. लिलावामध्ये प्रति क्विंटल तांदूळासाठी तीन हजार रुपये तर गहूसाठी दोन हजार २०० रुपये
बोली लावता येणार आहे. लिलावातील सर्वोत्तम बोलीची रक्कम तात्काळ
त्याच दिवशी चलनाव्दारे शासनास जमा करावी. तसेच स्वत:कडील
वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन धान्य साठा घेवून जावा. लिलावाच्या वेळी दिलेल्या
तोंडी सूचना व अटी बंधन कारक राहतील. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत
उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी केले
आहे.
वास्तविक हा लिलाव साधारण चार-पाच दिवसांचा कालावधी देऊन घ्यायला पाहिजे होता कारण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे बोली धारकांना आर्थिक बाबींची पूर्तता करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे हा लिलाव घेऊ इच्छिणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.