पंढरपूर - शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पंढरपूर येथील मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील व तालुक्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली जनसामान्यांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील असे ठरले.
 यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी गणेश दत्तू वाघमारे  यांची एकमताने निवड करण्यात आली.या निवडचे पत्र संतोष कवडे यांच्या हस्ते शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे, शिवबुध्द युवा संघटनेचे सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार पांडूरंग साठे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी अजिंक्य वाघमारे, शहाजी शिंदे,बनू लटके,चैतन्य शिंदे, किरण शिंदे,राजू थिटे, रोहित फावडे,गणेश पवार,निखिल दुरलैकर आदी उपस्थित होते.
 
Top