सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानने व भारतात सद्यस्थितीत वाहनांसाठी प्रदूषण मानके बीएस ४ चालू आहेत ही मानके दिनांक ३१ मार्च २०२० नंतर बंद केले जातील . कोणतीही बीएस ४ वाहनांची नोंदणी त्यानंतर केली जाणार नाहीत. वाहनांची नोंदणी शुल्क कर भरलेला असला तरीही दिनांक ३१ मार्च २०२० नंतर नोंदणी होणार नाही. सर्व वाहन वितरकांना ,वाहन धारकांना या द्वारे कळविण्यात येते की आपले वाहन काही कारणास्तव नोंदणी करायचे राहिले असेल जसे की वित्तदात्याकडील प्रकरण, मालकाचा अपघात, वाहन मालकाचे आजारपण तर अशा वाहनांची नोंदणी आपण दिनांक २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करून घ्यावी.संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१ मार्च २०२० नंतर फक्त बीएस ६ मानांकन या वाहनांचीच नोंदणी करता येणार आहे .


गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करणार्या इच्छुकांना याद्वारे कळविण्यात येते की २५ मार्च २०२० रोजी गुढीपाडवा आहे त्यापूर्वी किमान सहा ते सात दिवस अगोदर आपण आपल्या वाहनांची सर्व पूर्तता पूर्ण करून घ्यावी जेणेकरून HSRP नंबर प्लेट बसवून वितरक आपल्याला वाहन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डिलिव्हरी देऊ शकतील . सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व संगणकीय प्रणालीतील बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालक यांची कोणत्याही प्रकारची बीएस ४ मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जांचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपली वाहनांची नोंदणी प्रक्रिया २० मार्च २०२० पूर्वीच करून घ्यावी असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.
 
Top