पंढरपूर दि.१२ -  पंढरपूर-सातारा मार्गावरील मौजे सुपली तालुका पंढरपूर येथील उजनी कालव्या वरील पडलेल्या पुलाचे काम गुणवत्तापुर्ण तसेच  विहित मुदतीत पुर्ण करा अशा सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबधितांना दिल्या.

पंढरपूर-सातारा मार्गावरील मौजे सुपली तालुका पंढरपूर येथे उजनी कालव्यावर करण्यात येणाऱ्या पुलाची  पाहणी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली.
यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाली वाघमारे, भिमा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.एच.मिसाळ, तालुका पोलीस निरिक्षक प्रशांत भस्मे, मंडलाधिकारी समीर मुजावर, तलाठी रोहिणी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पंढरपूर-सातारा मार्गावरील मौजे सुपली तालुका पंढरपूर येथे उजनी कालव्यावरील पुल अचानक कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने वाहतुक व्यवस्था पर्यायी मार्गाने सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर-सातारा मार्गावरील तात्पुरता पर्यायी रस्ता तात्काळ सुरु करावा. पोलीस  प्रशासनाने मार्गावर वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी. या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच नवीन पुलाचे काम मुदतीत पुर्ण करावे  अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.शंभरकर यांनी यावेळी दिल्या.


मौजे सुपली येथील रहिवाशी सचिन माळी यांनी  घटनास्थळी थांबून दोन्ही बाजूच्या वाहनांना  पुला कडे येण्यापासून रोखले त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सचिन माळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
 
Top