पालघर- स्थानिक गुन्हे शाखा, वसई युनिट यांचेकडून एच. पी. ,कॅनोन , एँपसन कंपनीची बनावट शाई तयार करून बाजारात विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून ९९ लाख १८८० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पालघर जिल्ह्यात २१ फेब्रुवारी २०२० रोजी बारा वाजून पाच वाजता तुुुळींज पोलीस ठाणे हद्दीतील नालासोपारा पूर्व ,ओसवाल नगर , सहयोग बिल्डिंग, शॉप नंबर ४१३ मध्ये आरोपी राहुल देवजी तांडा,वय वर्षे ३०, बोरा बाजार,फोर्ट,मुंबई , याकूब इब्राहीम शेख,वय २८,मुंबई ,नारायण पटेल राहणार तारगाव ,अंधेरी, मुंबई यांनी एच.पी. , कॅनोन,एँपसन कंपनीची बनावट शाई तयार करून बाजारात विक्री केेल्याने या आरोपींविरुद्ध तुुुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग,वसई युुुनिट अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केेली.
 
Top