मुंबई दि.२५ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष आहे आणि भारतात माझा रिपब्लिकन पक्ष आहे असे सांगत भारतात डोनाल्ड ट्रम्प यांचे हार्दिक स्वागत आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चांगली मैत्री आहे.जगातिल दहशतवाद संपविण्या साठी अमेरिका आणि भारत एकजुटीने लढणार असल्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.ट्रम्प यांची भारत भेट अमेरिका भारत मैत्री संबंध अधिक दृढ करणारी ठरेल,असे मत ना. रामदास आठवले यांनी केले. 
 
Top