भाग -२
दरम्यान कै.प्रा .सदानंद वर्दे कै .श्रीमती मृणालताई गोरे , कै .बाबूराव चाकोते ,कै .वासुदेवराव उर्फ नानासाहेब देशमुख  तसेंच ज्येष्ठ नेते माजी आमदार व मंत्री गणपतराव देशमुख , माजी आमदार प्रकाश येलगूलवार , खासदार गिरीश बापट , माजी मंत्री व माजी खासदार खासदार गीते इत्यादी मान्यवरांनी "पार्लियामेंटरी अड्वोकसी "प्रोत्साहन दिले, बळ दिले, दिशा व दृष्टी दिली ती  तत्कालीन राज्यमंत्री , पंतप्रधान कार्यालय तसेंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अन माजी मंत्री व आमदार राधाकृष्ण विखे पाटील तसेंच अशोक खोत , रत्नाकर गायकवाड , अपूर्व चंद्रा ,बी .व्ही.गोपाळरेड्डी , डॉ .जगदीश पाटील , महेश झगडे , चंद्रकांत दळवी , उमाकांत दांगट ,  सुनील पाटील इत्यादी सनदी अधिकारी यांनी खूप सहकार्य दिले .
परिणामी अनुक्रमे :
१.रोजगार हमी योजना प्रभावीपणे कार्यान्वित झाली .करमाळा तालुक्यात २६ हजार मजूर नोंद झाली .
२ .तालुक्यात कृषी विभाग द्वारे रोहोयो अंतर्गत सुमारे १८ टी.एम.सी पाणी प्रतिवर्षी हार्वेस्ट होत आहे .
३ .रोहोयो द्वारे कुकडी कालवे कामकाज झाले .
४ .उजनी जलाशय सुमारे १४ हजार हेक्टर पाणी परवाने प्राप्त .व्यक्तिगत उपसा जलसिंचन योजना गतीने पूर्ण .
५ .दहिगाव उपसा जलसिंचन योजना , पुनर्वसन , शेतीला वीज पुरवठा अशी महत्त्वाच्या प्रश्नावर जनांदोलने केली परिणामी प्रश्न मार्गी लागले 
६ .कृषी विज्ञान विस्तार , कोरडवाहू शेती  तंत्रज्ञान  विस्तार , निर्यातक्षम फळ उत्पादन , प्रक्रीया व निर्यात कार्यान्वित 
७  गट शेती व मार्केटिंग राज्यांत गुणात्मक कार्यान्वित 
८ .दुग्ध संकलन , प्रक्रीया कार्यान्वित 
९.ठिबक सिंचन सुमारे ७० टक्के क्षेत्रात कार्यान्वित , 
१० .भटके विमुक्त आश्रमशाळा व संघटना संघर्ष रामकृष्ण माने यांच्या अधिनस्त कार्यान्वित , 
   ११.केळी निर्यात व प्रक्रिया कंदर येथे किरण डोके , रंगा शिंदे तर शेटफळ येथे गजेंद्र पोळ , नानासाहेब साळुंखे , विजू लबडे व प्रशांत नाईकनवरे द्वारा कार्यान्वित 
१२ .वांगी -३ ,पांगरे , कंदर येथे गट शेती नवे प्रस्ताव सादर ......

उर्वरित भाग- ३ उद्या
 
Top