पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील मालमत्ता धारकांना कर वसुली कर भरणेबाबत वारंवार  लेखी नोटीशी द्वारे  व स्पिकरद्वारे सूचना देवून सुद्धा तसेच जप्ती पुर्व नोटीस देवून सुद्धा मालमत्ता धारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील १० नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत .
पंढरपूर शहरामध्ये एकुण १९००० मालमत्ता धारक असुन ५००० झोपडपट्टी धारक आहेत. या मालमत्ताधारकांकडून मागील ८ कोटी ७९ लाख व सन २०१९-२० या सालाकरिता १० कोटी ८५ लाख अशी एकुण १९ कोटी ६५ लाख रु. चे मागणी आहे. यापैकी ८ कोटी ७४ लाख रु.वसुल झाले असुन १० कोटी ९१ लाख रु.येणे बाकी आहे. सदर वसुलीसाठी नगरपरिषदेतील २५ कर्मचा-यांची ४ विशेष वसुली-जप्ती पथक तयार करण्यात आले आहेत. जे थकबाकीदार कराची रक्कम भरणार नाहीत अशा मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असून स्पिकरद्वारेही त्यांच्या घरासमोर थकबाकीची रक्कम भरावी म्हणुन नावे पुकारण्यात येणार आहेत. सदर कर वसुलीची मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने शहरातील मोठे थकबाकी दारांची यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांना पुरेशी व वाजवी संधी देवूनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्याने महाराष्ट्र नगरपलिका अधिनियम १९६५ मधील कलम १५२ मधील तरतुदीनुसार ४००० थकबाकी दारांना जप्तीची कारवाई करण्याची नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. तदनंतरही सदर मालमत्ता धारकाने थकबाकीची रक्कम न भरल्याने आज नगरपरिषदेने सुरु केलेल्या कर वसुली धडक मोहिमेमध्ये शहरातील १० मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई करुन त्यांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. शासन निर्देशानुसार व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १५६ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने सदर मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याची तरतुद करण्यात आल्याने अशा थकबाकीदार मालमत्ताधारकांवर याप्रमाणे कारवाई करण्याची संकेत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी दिले आहेत. सदरची विशेष धडक मोहिम मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली,सचिन मिसाळ, सुवर्णा डमरे, अस्मिता निकम, प्रियंका पाटील, बाळासाहेब कदम, राजेंद्र देशपांडे, अनिल अभंगराव, समीर शेंडगे, संजय माने, सर्व कर लिपीक व शिपाई विशेष धडक मोहिमेत सहभागी आहेत.
 
Top