नातेपुते ((श्रीकांत बाविस्कर) :. पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत श्री महाराजांची काकड आरती तात्यासाहेब देशमुख व संगितादेवी देशमुख यांचे शुभहस्ते संपन्न झाली. सकाली ८.३० ते १०.३० या कालावधीत ह.भ.प राजेंद्र महाराज मोरे यांचे समर्पक असे जन्मकालाचे  प्रवचन झाले. मोरे महाराज यांनी याप्रसंगी कीर्तनाच्याद्वारे रामनामाचे माहात्म्य व त्यामुळे जीवनात घडणारे परिवर्तन यासंबंधी अतिशय समर्पक असे चिंतन केले. सकाळी ठीक ९.३० वाजता श्री महाराजांचा जन्मकाळ पुष्पवृष्टी करुन संपन्न झाला. पाळणा गायन मीनादेवी देशमुख आणि रेवती जोशी यांनी केले. याप्रसंगी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आरती मंडळ व चैतन्य जप संकुल शाखा नातेपुते यांचे वतीने तयार करण्यात आलेल्या २०२० या वर्षांतील सर्व अखंड २५ तास रामनाम जप, गुरुवारच्या सर्व आरत्या, व मासिक पोर्णिमेची आरती यासंबंधी विस्तृत माहिती असणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  ह.भ.प.राजेंद्र महाराज मोरे यांचे  शुभहस्ते संपन्न झाले. कीर्तना नंतर धैर्यशीलभाऊ देशमुख, रेवती जोशी, माऊली ठोंबरे, रणदिवे यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना सोहळा समितीचे प्रमुख धैर्यशीलभाऊ देशमुख म्हणाले की, चैतन्य जप संकुलातील २५ तास अखंड रामनाम जप व गुरुवारच्या आरत्यांमुळे समाजामध्ये प्रचंड परिवर्तन होतांना दिसत आहे.
   सतीश बर्गे यांनीही याप्रसंगी मनोगतात श्री महाराजांच्या कार्याला अनुसरून सर्व कार्यकर्ते काम करतात असे सांगून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 
          वर्धा जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या  जळीतकांडामधील पिडीता महिलेच्या प्रकृतीला आराम पडावा व अशा पद्धतीचे भ्याड दुष्कर्म करणाऱ्या नराधम समाजकंटकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याकरिता यावेळी उपस्थित सर्वांनी हात जोडून, डोळे मिटून आंतरिक तलमलीने प्रार्थना केली.
          यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रम संपला. याप्रसंगी आप्पासाहेब देशमुख,धैर्यशीलभाऊ देशमुख, तात्यासाहेब देशमुख,अमरशील देशमुख, सुरेश पांढरे,मामासाहेब पांढरे, अतुल बावकर,  प्रभाकर चांगण, संपतराव पांढरे, दत्तात्रय उराडे, महेश शेटे, बाळासाहेब पांढरे, संतोष काळे उपस्थित होते.
  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सतीश बर्गे, सुनील देशपांडे, महेश उराडे, सतीश बडवे, दत्तात्रय नागमल, कुंडलिक लाळगे, राजाभाऊ इंगोले, जालिंदर ठोंबरे, ज्योतिनाथ झिंत्रे, दिगंबर लाळगे, श्रीगणेश लाळगे, शेखर शेटे, बिपीन इंगोले, संभाजी लांडगे, हणमंतराव चिकणे, जितेंद्र मोरे,सुरेश तवटे, माऊली ठोंबरे, दत्तात्रय दीक्षित, धनंजय दीक्षित, सतीश ठेंगल, आदेश थोरात, सुरेश दळवी,आदि कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. याप्रसंगी  नातेपुते व मांडवे भजनी मंडळ व परिसरातील बहुसंख्य स्त्री-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top