पंढरपूर - अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे रा.ओझेवाडी ता.पंढरपुर याचेवर पोलीस तालुका ठाण्यात वाळु चोरी संदर्भात व सरकारी अधिकारी यांचे कामात अडथळा केलेबाबत ३ गुन्हे दाखल असल्याने त्याचेवर प्रतिबंध करण्याकरिता पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनकडून प्रस्ताव पाठविला होता.सदरचा प्रस्ताव उपविभागिय दंडाधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी मंजुर करून अजिंक्य उर्फ बबलु चंद्रकांत रोकडे यास पंढरपूर व मंगऴवेढा तालुकाच्या हद्दीतुन ६ महिन्याकरिता महाराष्ट्र  पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) (ब) प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे.सदर आदेशाची हद्दपार इसमास दि.३०/०१/२०२० रोजी बजावणी केली असताना देखील दि.११/०२/ २०२० रोजी रात्रो ११.४५ वा.सुमारास आहिल्या चौक भटुंबरे येथे उपविभागिय दंडाधिकारी, पंढरपूर व उपविभागीय दंडाधिकारी, मंगळवेढा यांचे अथवा महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या विशेष सचिवालयाचे परवानगी शिवाय पंढरपूर तालुका हद्दीत प्रवेश केला असताना मिळून आला म्हणुन त्याचे विरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ प्रमाणे पोलीस नाईक अशोक भोसले पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन यांनी  सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
    सदरची  कारवाई पो नि किरण अवचर यांचे मार्गदर्शनखाली सहा.पोलीस निरिक्षक श्री. ओलेकर , पोलीस नाईक अशोक भोसले व चालक पोलीस शिपाई वाघमारे यांनी केली आहे.
 
Top