रायगड जिल्ह्यात कर्जत, खालापूर आणि खोपोली येथे गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या या कारवाईत तिन्ही आरोपींना अटक केली असून त्याच्याकडून ४९.७०० किग्रॅ वजनाचा ५ लाख ९६ हजार ४० रुपयांचा गांजा, स्विफ्ट डिझायर कार असा माल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८आरोपींसह ९२.७०० किलोग्रामचा ११ लाखाचा गांजा, तीन कार, एक मोटारसायकल जप्त केलेली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.


जिल्ह्यात गांजा या अमली पदार्थाची सर्रास विक्री होत आहे. याबाबत आवदेश वर्मा (३१), व मुनीलाल राजभर (२५) दोघे राहणार कर्जत हे कर्जत परिसरात गांजा विक्री करण्यास येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे विभागला खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे ए शेख व सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी पळसदरी फाटा हद्दीत सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी स्विफ्ट डिझायर एमएच 46/ बिके 1519 या कारमधून आवदेश व मुनीलाल हे दोघे पळस दरी फाटा येथे आले असता स्थानिक गुन्हे पथकाने त्यांना अडवून त्याची तपासणी केली असता १५.५०० किग्रॅ वजनाचे १ लाख ८६ हजार किमतीचा गांजा आढळून आला.

या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गांजा कोणाकडून आणला याची कसून चौकशी केली. त्यावेळी नाशिक येथे पथक जाऊन इफतिकार शेख (३६) यास अटक केली. त्याच्याकडून ३४२०० किग्रॅ वजनाचा ४ लाख १० हजार ४० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

खालापूर पोलिसांनी ७ फेब्रुवारी रोजी सापळा लावला असता टाटा इंडिका एमएच 06/ डब्ल्यू 5146 आणि एमएच 12/ जीएन 0374 या दोन कार मधून येणारे राजू चव्हाण, दिलीप साळुंखे, बाळू चव्हाण, रमेश चव्हाण, सचिन साळुंखे याना अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे ३१.१२० किग्रॅ वजनाचा ३ लाख ७३ हजार ४४० रुपये किमतीचा गांजा सापडला. या पाचही आरोपींना आणि वाहनांना ताब्यात घेऊन खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खालापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे पथकाने एकूण ९२.७०० किलोग्राम वजनाचा ११ लाखाचा गांजा, तीन कार, एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करून आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर याच्या मार्गदशनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे ए शेख, सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोह सुभाष पाटील, महेश पाटील, हनुमंत सूर्यवंशी, स्वप्नील येरूनकर, पोशी संदीप चव्हाण, चालक पोह देवराम कोरम या पथकाने पार पाडली
 
Top