पंढरपूर येथे रत्नाकर महाराज तनाळी मठ, तालुका पंढरपूर यांचे विद्यमाने संतांचा मेळावा मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.


 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले असून कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्रा. लक्ष्मण ढोबळे आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी खासदार धनंजय महाडिक ,रिपाईचे प्रदेश संघटक सुनील सर्वगोड , अँडवोकेट महेश कसबे ,बहुजन रयत परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश यादव, महात्मा फुले सूत गिरणीचे संचालक अभिजीत कांबळे, संभाजी भोसले हे आहेत.
 

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपाईचे युवा आघाडीचे प्रदेश संघटन सचिव दिपक चंदनशिवे आणि बहुजन परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी मंत्री प्रकाश खंदारे आहेत. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शिवाजी महाराज तनाळी मठ तालुका पंढरपूर हे असून या कार्यक्रमासाठी मुख्य मठाधिपती इंचगिरी मठ प्रभूदेव महाराज, जामगाव मठ तालुका पारनेर येथील दत्तात्रय बढे महाराज ,बेळगाव येथील मौन काडसिद्धेश्वर महाराज, कनूर तालुका सातारा ब्रह्मानंद स्वामी महाराज, हुबळी कर्नाटक येथील डॉ ए सी वाली महाराज, नामानंद स्वामी मठ पंढरपूरचे दयाघन महाराज, मंगळवेढाचे तुकाराम महाराज, सोलापूर येथील शिवानंद महाराज, रेवणसिद्ध व्हनमराठे महाराज, शिंगणापूर येथील मीराताई महाराज, गोरेगाव, मुंबई येथील करगुटकर महाराज, कर्नाटकचे भाग्योदय महाराज, दामाजी संस्थान मंगळवेढ्याचे विष्णूपंत अवताडे महाराज, तुकाराम महाराज संस्था, बीडचे सुरेशानंद महाराज, दत्तधाम सिंदगाव, तुळजापूरचे बाल योगी महेश सरस्वतीजी महाराज ,नगरचे संपत महाराज, मारोळीचे संदेश भोसले महाराज, हुन्नूर तालुका मंगळवेढाचे होनमुरे महाराज, नंदेश्वर मंगळवेढा बाळासाहेब महाराज , मंगळवेढा येथील देविदास महाराज ,बंडोपंत महाराज , गोवे महाराज, शारदाताई महाराज, डोंगरगाव मठ मंगळवेढा येथील प्रभू आकळे महाराज, तनाळी मठाचे रविदास महाराज, पंढरपूर येथील एकनाथ महाराज, लक्ष्मण महाराज, अंबादास महाराज , सांगोला येथील मच्छिंद्र महाराज, त्र्यंबकेश्वर येथील अरविंद महाराज,कडलास मठ सांगोला येथील बाळूमामा महाराज ,जत तालुका येथील अंबाना महाराज ,आसबेवाडी,  मंगळवेढा येथील पुंडलिक साठे महाराज, महिपती महाराज पंढरपूर काटकर महाराज ,भोसे ,तालुका मंगळवेढा हे उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमाचे सौजन्य यशवंत खताळ महाराज, कुंजीरवाडी मंगळवेढा आणि काशिलिंग कोळेकर , सोनके ,तालुका पंढरपूर हे आहेत.हा कार्यक्रम पंढरपूर येथील भक्तीमार्गावर वेदान्त भक्त निवास येथे होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपाईचे युवा आघाडीचे प्रदेश संघटन सचिव दिपक चंदनशिवे आणि बहुजन परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश खंदारे यांनी केले आहे.
 
Top