नातेपुते ,(श्रीकांत बाविस्कर)- मोराची तालुका माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योतीचे प्रस्थान करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक, मोरोची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर बालचमूनी आपले विचार व्यक्त केले.   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरोची ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय पानसकर यांनी केले. 

  

या कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थिती लाभली. माजी खासदार व श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील , सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख ,मार्केट कमिटी अकलूजचे उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरसिंह सुळ पाटील यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.   
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.  चंद्रकांत साळुंखे सर यांनी केले .शिवजयंतीनिमित्त हभप ॲडव्होकेट राहुल महाराज पारठे यांचे शिवचरित्रावर किर्तन पार पडले .हा कार्यक्रम शिवजयंती उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ यांच्या नियोजनाखाली पार पडला.
 
Top