सोलापूर - उमेद अभियानात शासकीय काम करीत अपघातात मृत्यु पावलेल्या मृत कंत्राटी कर्मचारी यांचे कुटूंबियास तातडीची मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. 
सोलापूर शासकीय विश्रामधाम येथे महाराष्ट्र राज्य  कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी पालकमंत्री दिलीप वळसे - पाटील यांना भेटून सविस्तर निवेदन दिले. या प्रसंगी कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शहरचे कार्यकारी अध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, वसीम शेख, शशीकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, मृतांच्या कुटूंबियांना तातडीची मदत देण्यात येणार आहे आणि जखमी कर्मचारी पूर्ण बरा होईपर्यंत त्यांना शासकीय मदत देण्यात येणार आहे.मानवतेच्या भावनेतून सर्व मदत करण्यात येईल.शासन कुटूबियांच्या पाठीशी आहे. 

या निवेदनामध्ये कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी मृत कर्मचारी यांना ५ लाख रूपये तर गंभीर जखमी दोन महिला कंत्राटी कर्मचारी वर्षा रामचंद्र आखाडे व शुभांगी बोंडवे यांना तातडीची ५ लाख रूपये मदत द्यावी.इतर जखमींना देखील तातडीची तीन लाख रूपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अपघाती विम्यापासून सर्व कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी धोरण बनविण्यात यावे.राज्यांत २ लाखापेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत,असेही सचिन जाधव यांनी सांगितले.
 
Top