सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी विभाग, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या आदेशानुसार ३० जानेवारी २०२० रोजी सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी विभागाची बैठक सोलापूर शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तांबवे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सतीश धोंडीराम सातपुते यांची पंढरपूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली . 
  या निवडीचे पत्र सोलापूर शहराध्यक्ष रुपेशकुमार भोसले व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय तांबवे यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी शहर कार्याध्यक्ष मोहम्मद इंडीकर, शहर उपाध्यक्ष रेवन्नाथ चव्हाण, घनश्याम महाशके, मच्छिंद्र कोष्टी, अंबादास देवगण, नितीन तांबे, औदुंबर गोसावी, शंकर देवगण, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
 
Top