पुणे दि. १८: सिल्लोड येथील आधीच्या महिला विरोधी हिंसाचाराच्या घटना नविनच असताना डोंगरगाव या गावात आज आई आणि मुलीचा विहिरीत पडून आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना संशयास्पद असल्याबाबत गावातील नागरिकांनी उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या दूरध्वनी द्वारे संपर्क करून लक्षात आणून दिले. तात्काळ ना.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्याशी संपर्क करून या घटनेची सखोल चौकशी करण्याची सूचना दिली. याच बरोबर या घटनेसंदर्भात कोणाला माहिती असल्यास तपास पोलीस अधिकारी किंवा उपसभापती यांच्या कार्यालयाच्या ई-मेल आयडी- dychairman.mls@gmail.com तक्रारी देण्याची सूचना केली आहे. यात काही आरोपी असतील तर नक्की कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ना.डॉ.गोऱ्हे नागरिकांना दिले आहे.
 
Top