मुंबई दि.१५ - जागतिक किर्तीचे महाकवी ; पँथर चे संस्थापक नेते ; दिवंगत  पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जयंती निमित्त ( दि.१५ फेब्रुवारी ) त्यांच्या अंधेरीतील फ्लोरिडा या इमारतीतील निवासस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

यावेळी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या मल्लिका अमर शेख, त्यांचा पुत्र आशुतोष ढसाळ यांच्या प्रकृतीची चौकशी केली.यावेळी दिवंगत नेते  नामदेव ढसाळ यांच्या जुन्या आठवणींना मल्लिका शेख आणि ना.आठवले यांच्या चर्चेत उजाळा मिळाला. 
यावेळी मुंबईच्या अंधेरी उपनगरात दिवंगत पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. 


यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. 
 
Top