पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने श्री.संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन माजी उपनगराध्यक्ष संजय घोडके यांच्या हस्ते माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास स्वच्छता व आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर, गोविंद घोडके, दयानंद पवार, भुषण घोडके तसेच नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
 
Top