पाठखळ ता.मंगळवेढा येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत मंगळवार दि.२५ फेब्रुवारी २०२०रोजी विविध शालेय स्पर्धा व संस्कृतिक कार्यक्रमासह वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न झाले.
विद्यार्थ्यांच्या विकास हा बालवयातच होत असतो यातूनच त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळून विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक, बौद्धिक विकास व्हावा हा या मागचा महत्वाचा उद्देश आहे असे मत कार्यक्रमा च्या प्रमुख पाहुणे सौ.विनया ताई परिचारक यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ.विनयाताई परिचारक यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे व रंगमंचाच्या पूजननाने करण्यात आली.यावेळी सौ.कर्णीकर मॅडम,युटोपियन शुगरचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापिका काळुंगे मॅडम यांचे सह सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.     
 यावेळी बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन चांगली पिढी तयार व्हावी हा प्रशालेचा मानस असून लहान मुलांच्या कलागूणांना वाव मिळावा,त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत सर्व शिक्षक-शिक्षिका यांचे वेळो वेळी व अमूल्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत असते. यावेळी बालकलाकारांनी ‘नाच रे मोरा’, “आय लव माय इंडिया”,’रंग दे बसंती’ आदी गाण्यांवर नाच करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच थोर पुरुषांच्या वेशभूषेतील बाल विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
 
Top