मुंबई,(महान्यूज)-करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात ७७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ७७ जणांपैकी ७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी दोनजण निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
दि. २१ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावर ४४ हजार ५१७ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधीत भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधीत भागातून २७९ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.सध्या  प्रत्येकी २ जण मुंबई व पुणे येथे भरती आहेत.
 
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ बेड्स उपलब्ध आहेत.
 
Top