*दुबईत महाबीज २०२० उद्योग परिषदेचे ना. रामदास आठवलेंच्या हस्ते उदघाटन* 
   दुबई दि.२३ -  भारतात उद्योगधंद्यांच्या विकासा साठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे.ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दुबई येथील हॉटेल ऍटलांटिस मध्ये गल्फ महाराष्ट्र बिझनेस फॉरमच्यावतीने महाबीज २०२० या उद्योजकांच्या भव्य परिषदेचे उदघाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उद्घाटकिय भाषणात ना. रामदास आठवले यांनी भारतात उद्योगधंद्याच्या वाढीसाठी  केंद्र सरकार उद्योजकांना पाठिंबा देत असल्याचे प्रतिपादन केले . 
 यावेळी संयुक्त अरब अमिरातीत संपूर्ण आखाती राष्ट्रात स्थायिक झालेले मराठी भाषिक उद्योजक आणि महाराष्ट्रातील २०० हून अधिक असे एकूण ५००  उद्योजक या परिषदेला उपस्थित होते. दुबई तील प्रसिद्ध शराफ ग्रुपचे उपाध्यक्ष उद्योगपती मेजर शरफूद्दीन शराफ, गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर, राहुल तुळपुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
ना. रामदास आठवले यांच्या समवेत दुबई दौऱ्यात त्यांचे सुपूत्र जित आठवले तसेच रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे उपस्थित होते. 

भारतीय नवउद्योजकांना त्यांचे उद्योग वाढविण्या साठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत.मागासवर्गीय उद्योजकांच्या उद्योगवाढी साठी व्हेंचर कॅपिटलसारख्या योजना सुरू असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. दुबई आणि संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीत महाराष्ट्रा तील मराठी उद्योजकांनी येथे यशस्वी उद्योग उभारणी केल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत गल्फमधील सर्व मराठी उद्योजकांचे कौतुक केले. गल्फमध्ये उद्योग करणाऱ्या मराठी उद्योजकांच्या अडीअडचणीत भारत सरकार मदत करेल ,येथील मराठी आणि सर्व भारतीय उद्योजकांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीर उभे राहणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.
यावेळी महाबीज २०२० च्या परिषदेतील प्रमुख आयोजक जीएमबीएफच्या पदाधिकाऱ्यांनी ना. रामदास आठवले यांच्या शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कर्तृत्वाचे कौतुक केले. शेतमजूर मातेच्या पोटी जन्माला येऊन कोणत्याही घराणेशाही शिवाय आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान देऊन भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री दोन वेळा बहुमान मिळविण्याचा ना. रामदास आठवले यांचा प्रवास जगभरातील तरुणांना प्रेरणा देणारा आहे. प्रचंड संघर्षातून निर्माण झालेले ना रामदास आठवले यांचे नेतृत्व कर्तृत्व व्यक्तिमत्व आदर्श ठरले आहे. त्यामुळे गल्फमधील मराठी उद्योजकांना ना रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम तर्फे देण्यात आली. 
 
Top