नातेपुते (श्रीकांत बाविस्कर): मनसे विद्यार्थी सेनेचे माळशिरस तालुकाध्यक्ष प्रेम देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ३४१ रक्त दात्यांनी रक्तदान केले. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सभागृहात या शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले .
या वेळी मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, माजी सरपंच रावसाहेब पांढरे पाटील,अतुल बावकर,अजित बाविस्कर,संदीप ठोंबरे ,विट्ठल ठोंबरे , संतोष देवकाते ,किरण टाकले ,सागर बिचुकले , मार्तंड देवकाते , अक्षय ठोंबरे , नागेश मेटकरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
  रेवनील ब्लड बँक ,सांगोला यांच्यावतीने हे रक्त दान शिबीर घेण्यात आले होते .३४१ जणांनी रक्तदान केल्यामुळे प्रेमभैय्या देवकाते पाटील युवा मंच यांचे कौतुक होत आहे.
  टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव,जय हिंद सेनेचे संस्थापक अध्यक्ष सनी देवकाते पाटील युवा नेते सागर देवकाते, टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष साहेब बंडगर ,गजानन पद्मन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 
 
Top