बाहुबली - वीर सेवा दल मध्यवर्ती समितीद्वारे प्रतिवर्षी घेण्यात येणारे शाखा संघनायक व उपसंघनायक प्रबोधन शिबीर रविवार दि २३ फेब्रुवारी रोजी बाहुबली येथे संपन्न होणार आहे.
  या शिबिरामध्ये वीर सेवा दलाची कार्यप्रणाली , वाटचाल,शाखा उपक्रम, सामाजिक व राष्ट्रीय योगदान यांसह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
   या शिबिरासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील १७० शाखांचे संघनायक व उपसंघनायक उपस्थित राहणार आहेत.सन २०२० सालाकरिता वीर सेवा दलाने शाखा नोंदणीचे अभियान राबविले होते.या अभियानांतर्गत १७० शाखामधून ९०००  सदस्यांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे.तसेच नुकतेच वीर सेवा दल अंतर्गत श्री शांतिसागर संस्कार समितीच्यावतीने पाठशाळा परीक्षा संपन्न झाल्या.एकाच वेळी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ३०८ केंद्रावर या परीक्षा घेण्यात आल्या.या परीक्षेसाठी ९१०० विद्यार्थी हजर होते.
 
Top