पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी भाजपकडून कृष्ण वाघमारे तर पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून इरफान मुजावर व अंबादास धोत्रे या तीन नगरसेवकांच्या बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या.


पंढरपूर नगरपरिषदचे तीन रिक्त झालेल्या स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यपदी भारतीय जनता पक्षा च्यावतीने कृष्णा नानासाहेब वाघमारे, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचेवतीने इरफान मुजावर व अंबादास धोत्रे यांची निवड पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांनी जाहीर करताच नगरपरिषदेच्या दारात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव सुरू केला आणि हलगीच्या तालावर ठेका धरला .


सभागृहांमध्येही मोठ्या जल्लोषात या निवडीचे स्वागत करण्यात आले. शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित कामे करण्याची मोठी जबाबदारी आता या नगरसेवकावर आली आहे.
या निवडीसाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर व सभा लिपिक राजेंद्र देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी उपनगराध्यक्षसह नगरसेवक उपस्थित होते.
  निवडीनंतर कृष्णा वाघमारे, इरफान मुजावर व अंबादास धोत्रे या नूतन नगरसेवकांचा सत्कार नगरपरिषद पक्षनेते श्री.अभ्यंकर यांंचे हस्ते आणि युवा नेते प्रणव परिचारक,माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. 
 
Top