पंढरपूर,(विजय काळे) - सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा तबला वादक ,आदर्श संगीत शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांना आदर्श फाउंडेशन,कोल्हापूर यांचा 
यावर्षीचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला.  कोल्हापूर येथे हा पुरस्कार समारंभ झाला.विकास पाटील यांनी गेल्या दहा वर्षात सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी, पंढरपूर, सोलापूर व सांगोला या तिनही शाखेत कार्य करताना पाच हजाराहुन अधिक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणासोबत अतिशय उच्चस्तरीय मानवी मूल्यांचे संस्कार देण्याचे कार्य केले आहे. त्यासोबतच खंडाळी या आपल्या गावासह अनेक गावामध्ये दरवर्षी  विशेष ग्रामीण विकास कार्यक्रम, उन्नत भारत अभियान, स्वच्छता अभियान,शिव-हारी विचार कार्यक्रम,बाल शिक्षण, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजास योग्य वळण देण्याचे कार्य केले आहे. कलापिनी संगीत विद्यालय मार्फत असंख्य अनाथ, अपंग, गरिब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. संगीत कलेसोबतच संतसाहित्य, विविध धर्म व जातीच्या पलीकडील विचार व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतच अनेक महापुरूषांच्या कार्याचा अभ्यास करून एक उच्चस्तरीय विचार  समाजात पोहचविण्याचे कार्य चालू आहे. या विविधांगी व्यक्तीमत्वाचा विचार करून या पुरस्कारासाठी विकास पाटील यांची निवड झाली आहे.
 
Top