बहुजन समाजाला न्याय देण्यात राष्ट्रवादी पक्षच अग्रेसर-संजय घोडके
पंढरपूर - कॉग्रेस ओबीसी सेलचे मा.जिल्हाध्यक्ष संजय घोडके यांनी ना.दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील,जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील, तालुका अध्यक्ष ऍड. दीपक पवार,शहराध्यक्ष सुधीर भोसले,युवराज पाटील,जि.प.सदस्य अतुल खरात,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे कार्यध्यक्ष सुजित गायकवाड आदी उपस्थित होते.
     यानंतर बोलताना संजय घोडके  म्हणाले कि,राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या राज्यातील बहुजन व अल्पसंख्य जाती जमातींना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने पार पाडली.यापूर्वी मी कॉग्रेसमध्ये होतो पण शरदचंद्र  पवार साहेब यांचे विचार आदर्श मानूनच काम करीत होतो.सोलापूर जिल्ह्यात काम करीत असताना आ. भारत भालके ,राजूबापु पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार तळागाळात पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे.  
    या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजय घोडके यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
Top