दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ चार कॉर्नर सभा; महिला मेळाव्यातही केले मार्गदर्शन

दिल्ली  - दिल्ली काबीज करण्यासाठी भाजप कडून महाराष्ट्रातील नेत्यांवरसुद्धा प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, येत्या ८ तारखेला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून ११ तारखेला मतमोजणी होणार आहे. 

   दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी रक्षाताई खडसे यांनी प्रचाराची सुरवात केली. आदर्शनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजकुमार भाटिया यांच्या प्रचारार्थ आदर्श नगर येथे त्यांच्या २ कॉर्नर सभा पार पडल्या. जहांगीर पुरी येथे १ व गोपालपुरा येथे १ कॉर्नर सभा घेतली. उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महिला मीटिंगमध्ये त्यांनी महिलांशी संवाद साधला. जनतेला खोटी वचने देणाऱ्या केजरीवाल सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचे आवाहन खासदार रक्षाताई खडसे यांनी उपस्थित मतदारांना केले.
 
Top