जपानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या ११९ भारतीयांना आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशाच्या पाच प्रवाशांना घेऊन टोकियोहून एयर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालं आहे .

या जहाजावरच्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिलेल्या सहकार्य केलेबद्दल परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी जपान तसेच चीन सरकारचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले. परत आणलेल्या सर्व प्रवाशांना हरयाणामध्ये मानेसार इथं १४ दिवस देखरेखी खाली वेगळं ठेवलं जाईल. या जहाजा वरच्या एकूण १३८ भारतीयांपैकी १६ भारतीय कर्मचाऱ्यांना विषाणूसंसर्ग झाला होता. या सोळा जणांवर जपानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतीय हवाई दलानं कोरोनाग्रस्त वुहानमधून ७६ भारतीयांना आणि सात देशांच्या ३६ नागरिकांना परत आणलं आहे. बांगलादेश,म्यानमार, मालदीव, चीन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका , मादागास्करचे हे नागरिक आहेत. भारतानं आपल्या नागरिकांना वुहानमधून परत आणण्यासाठी एक विमान पाठवलं आहे आणि या विमानातून चीनला आवश्यक वैद्यकीय सामग्री देखील पाठवली आहे. 
 
Top