छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


छत्रपती संभाजी महराज चौक येथील संत दामाजीपंत मठामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये ५२ महिलांनी सहभाग घेतला होता. अनेक पारंपारिक खेळ व बुध्दीवर्धक खेळांचा यामध्ये समावेश होता. या कार्यक्रमातील विजेत्यांना आयोजकांच्यावतीने बक्षीस देण्यात आले. यामध्ये सौ. सुवर्णा जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी मिळवली. सौ.शितल जव्हेरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावत चांदीचे नाणे मिळवले, तर सौ. धनश्री तांदळे यांनी तृतीय क्रमांक पटकावत रोख पारितोषीक मिळवले.

इतर सर्व सहभागी महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोसले होते. कार्यक्रमाचे आयोजन सौ.श्रध्दा शेखर भोसले व श्रीमती राणी कौलगे यांनी केले होते.

यावेळी अपंग व मुकबधीर विद्यालय, अनाथ आश्रमातील मुलांना खेळणी व खाऊ वाटपही करण्यात आले. छत्रपती उदयनराजे यांच्या आदेशानुसार इतर खर्चाला फाटा देऊन समाजो पयोगी उपक्रम राबवणे या उद्देशाने आमचे प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहे. यापुढेही समाजहिताचे व सर्वसामान्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील असे उपक्रम राबवणार असल्याचे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष शेखर भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी माऊली जगताप, सागर कदम, ओंकार चव्हाण, गणेश निंबाळकर, सिध्दार्थ गुरव, प्रज्वल मोरे, सोपानकाका देशमुख, आण्णा फुगारे, सागर चव्हाण, अनिकेत मेटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.  
 
Top