भाग -१
प्रिय मान्यवर स .न .वि .वि .
जय जिनेन्द्र ,
दिनांक ५ मार्च २०२० गुरुवार रोजी मी ७१ वे वर्ष पूर्ण करून ७२ व्या वर्षात पदार्पण करतो आहे !
आपण माझ्या जीवनातील एक मान्यवर आहात . दिशा, दृष्टी , आधार देत प्रोत्साहित देणारी शक्ती आहात .
मी गेली चाळीस वर्ष कार्यरत आहे .कार्यरत असतांना मी एम.एन.रॉय यांचा"नव मानवतावाद , अन महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान याचं प्रमाणे जैन तत्वज्ञानातील अपरीग्रहत्वं,संयम ,अहिंसा,सेवा सत्याग्रह ,संत कबीर अन जगद गुरु संत तुकाराम यांची डोळस दृष्टी, आचार्य शांतीसागर मुनिश्री यांची मौन साधना यांचा माझ्यावर प्रभाव पडला हे निर्विवाद सत्य आहे .
राहुरी विद्यापीठ येथील आंदोलनात खूप खोलवर समजत गेलं .तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी , श्रीमती डॉ.इंदुमती पारिख,डॉ.रावसाहेब कसबे , डॉ.आ.ह .साळुंके अन श.पा. अर्थात काँम्रेड शरद पाटील ,धुळे यांनी वैचारिक दृष्टी दिली.जडणघडण केली .
राशीन येथे डॉ.कुमार सप्तर्षी यांचेकडे जन आंदोलन , परिवर्तन , ग्रामीण राजकीय प्रवाह याचं यथार्थ ज्ञान व प्रशिक्षण प्राप्त झालं !
राशिन नंतर मी करमाळा येथे स्वतंत्र कार्यरत झालो .
कृषीभूषण व पद्मश्री डॉ .आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली कृषीविज्ञान विस्तार कार्य सुरू झाले .साधारणतः १९८० साली ठिबक सिंचन सर्वत्र व्हावे म्हणून कार्य सूरु केलं .आज ठिबक सिंचन हे नियमित झालं आहे .श्री .रत्नाकर गायकवाड यांचे पाठोपाठ अनुक्रमे बी.व्ही.गोपाळ रेड्डी , अपूर्व चंद्रा ,डॉ.जगदीश पाटील यांच्या सहकार्यातून रोहयो अंतर्गत प्रतिवर्ष सुमारे १८ टी . एम .सी .पाणी हार्वेस्टिंग केलं जाऊ लागलं .
पुनर्वसनाचे प्रश्न , सुमारे १४५०० हेक्टर क्षेत्राला पाणी परवाने यांत कमालीचे यश आलं.आदिनाथ साखर कारखाना उभारण्यात सहयोग देता आला .
आता निर्यातप्रधान केळी लागवड प्रकल्प, दुग्ध प्रकल्प ,गट शेती ही कामे प्रगतीची साक्ष देतात .
गावोगावी कार्यकर्ते व त्यांची सक्षम फळी तयार करण्यासाठी अनेकांचे हात हाताला प्राप्त झाले .
जैन इर्रिगेशनचे संस्थापक कै .भंवरलाल जैन उर्फ मोठे भाऊ यांनी गांधीजींच्या वैचारीक सूत्रांची कृतीशील ओळख करून दिली .
कै .न्या .चंद्रशेखर धर्माधिकारी,कै .न्या.वि.म .
तारकुण्डे , कै.बाबा फाटक (दापोली),कै .ग.प्र.
प्रधान सर , प्रा.ठाकूरदास बंग (वर्धा) यांनी गांधी तत्वज्ञान वेळोवेळी समजवून दिले .
प्रा .डॉ .रावसाहेब कसबे यांनी डॉ .आंबेडकर , गांधी अन कार्ल मार्क्स हे समजावले .
     ( क्रमशः
 
Top