रानांत जे पेरलेले ते खळ्यात येईतो खरं नाही
निसर्गाचा कोप केंव्हा कसा होईल सांगता येत नाही!!१!!
निसर्गचक्र अनिश्चित गृहीत धरता येत नाही
माणूसच निसर्गाचा शत्रू हे अंशानेही खोटं नाही!!२!!
निसर्ग उध्वस्त समतोल आता उरला नाही
पशुपक्षी वृक्षवल्ली नामशेष पर्याय दिसतं नाही!!३!!
डोंगर नद्या नाले गायब विनाश थांबत नाही
माणूस लालची समजत असूनही शहाणपण येत नाही !!४!!
शेती शाश्वत नाही, भाव बांधून मिळत नाही
कर्ज बोकांडी,आत्महत्या शिवाय मुक्ती नाही !!५!!
शेतीला धोरण नाही, राजाश्रय नाही
कोणीही सत्तेवर आले तरी गुंजभर फरक नाही !!६!!
आनंद कोठडीया ,जेऊर ,९४०४६९२२००