मुंबई दि.१६ - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांचा बोरिवली येथील जांभळी गल्ली येथे जनता दरबार नुकताच आयोजित करण्यात आला होता.या जनता दरबारात उत्तर मुंबईतील जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या जनता दरबारात ना रामदास आठवले यांनी अनेक नागरिकांच्या समस्या सोडविल्या.


ना.रामदास आठवले यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपजिल्हाधिकारी उमेश बिऱ्हाडे ,पोलीस उपायुक्त मोहन दहिकर आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकाला बौद्ध नगरी नाव देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन मनमोहन गुप्ता यांनी केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंना दिले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशी यांच्या समस्यांचे गाऱ्हाणे पत्रकार संजय बोर्डे यांनी मांडले.


केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जनता दरबाराचे आयोजन रामदास आठवले फाउंडेशन च्यावतीने चंदन ठाकूर यांनी केले होते. यावेळी  रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, हेमंत रणपिसे, चंद्रकांत पाटील,भीमराव सवातकर,  संदीप शिंदे , सुनील गमरे, दिलीप व्हावळे आदी उपस्थित होते. 
 
Top