पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांनी आरोग्य निरिक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर व विविध भागात नेमलेल्या मुकदम यांच्यासमवेत आरोग्य विभागा मार्फत करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली. यात दर्शन मंडप, मंदीर परिसर,वाळवंट, ६५ एकर या भागाची पाहणी करण्यात आली.


आरोग्य विभाग चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे निदर्शनास आले . बऱ्याच ठिकाणी समस्या निर्माण होत होते पण त्यावर तातडीने उपाय योजना करण्यात येत होत्या. सार्वजनिक शौचालय व वारी निमित्ताने उभा केलेल्या शौचालया ठिकाण पाणीपुरवठा करुन स्वच्छता ठेवण्यात यावी असे सांगितले. सर्व प्रकारच्या स्वच्छता संदर्भात नेमलेल्या मुकादमाने स्वत: आढावा घ्यावा असे सांगितले.


पौर्णिमेपर्यत अशाच प्रकारे काम करुन भाविकांसाठी चांगल्या सुवीधा पुरवण्यात याव्यात अशा सुचना सभापती विवेक परदेशी यांनी दिल्या.
 
Top