राज्यभर रिपाइंचे भूमीमुक्ती आंदोलन
केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांच्या पुन र्विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले भेटणार 
 मुंबई  - झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी ,झोपडी वासीयांच्या न्याय हक्कासाठी आरपीआय संघर्ष करीत राहील. सन २०१४ पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत करण्यात यावे. कोणत्याही प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपड्यांचे आधी पुनर्वसन केल्या शिवाय गरिबांच्या झोपड्यांना हात लावाल तर याद राखा असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बांद्रा येथे मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजित झोपडपट्टी वासीयांच्या मोर्चात राज्य सरकारला दिला.
 "आमची फिरत नाही खोपडी , म्हणून तुटते आमची झोपडी ,जर फिरली आमची खोपडी तर तुटू देणार नाही आमची झोपडी " अशी कविता सादर करीत झोपडीवासीयांनी आपल्या निवाऱ्याच्या हक्कासाठी राज्य सरकार विरुद्ध  आक्रमक संघर्षशील होण्याचे आवाहन केले. 

केंद्र सरकार च्या रेल्वे,बीपीटी, संरक्षण मंत्रालय आदी जमिनींवरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी या जमिनी केंद्र सरकारकडून राज्य सरकारने खरेदी करून त्या जमिनींवर एस आर ए योजना राबवून तेथील झोपडीवासीयांचे पुनर्वसन केले पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयांवर रिपाइं ( आठवले) यांच्यावतीने भूमीमुक्ती आंदोलन करण्यात आले.त्यानुसार २०१४ च्या  झोपड्यांना शासकीय मान्यता देण्यात यावी,  भूमिहीनांना प्रत्येकी ५ एकर जमीन शेतीसाठी देण्यात यावी, गायरान जमिनीवरील २०१४ पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्यात यावे या मागण्यांसाठी ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार राज्यभर रिपाइं तर्फे भूमीमुक्ती आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत मुंबईत झोपडपट्टीवासीयांचे  रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात आले. 
 यावेळी सौ. सीमाताई आठवले उपस्थित होत्या. मुंबईत आंदोलनाचे आयोजन रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,रिपब्लिकन झोपडी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाले, सरचिटणीस रतन अस्वारे यांनी केले. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर, माजी आमदार सुमंतराव गायकवाड , काकासाहेब खांबळकर,  सुरेश बारशिंग, लखमेन्द्र खुराणा, पोपटशेठ घनवट, अनिल गांगुर्डे, सौ. शिलाताई गांगुर्डे, ऍड.आशाताई लांडगे, ऍड. अभयाताई सोनवणे, मुस्ताक बाबा, प्रकाश जाधव, संजय पवार,हरिहर यादव, सिद्धार्थ कासारे, रमेश गायकवाड, उदयराज तोरणे ,मोहन चव्हाण, अमित तांबे, बाळासाहेब वाघमारे, नागेश तांबे, किसन रोकडे, ब्रिजेश आर्या,याकूब खान,भीमराव कांबळे,अर्जून माघाडे, दास दुबटे, निर्मला सिंह, उल्हास साळवी ,हेमंत रणपिसे आदी उपस्थित होते.
                
 
Top