फलटण,(डॉ निनाद दोशी) दि. १७ - फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित फलटण डॉक्टर्स प्रीमियर लीग ५ क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. शहरातील सर्व डॉक्टर्स विशेषतः महिला डॉक्टर्संनी यामध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध केले.


प. पू. गोविंद महाराज उपळेकर देवस्थान ट्रस्टच्या सचिव व ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि बक्षीस वितरण ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या हस्ते झाले.
   

या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी २ संघ महिला डॉक्टर्सचे होते. या स्पर्धेत डॉ.संदीप बनकर यांच्या नेतृत्वाखालील बाणगंगा बटालियन संघ विजेता ठरला तर डॉ.राकेश भागवत नेतृत्वाखालील तानाजी वॊरिअर्स संघ उपविजेता ठरला . डॉ.सौ.संजीवनी राऊत यांच्या नेतृत्वाखालील जलवा महिला संघ विजेता आणि डॉ. सौ. सुनीता पोळ यांच्या नेतृत्वाखालील जोश महिला संघ उपविजेता ठरला.
     या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसांमध्ये डॉ. मयूर गायकवाड यांना मॅन ऑफ द सिरीज, डॉ. राकेश भागवत यांना बेस्ट बॅट्समन, डॉ. राहुल बिचकुले यांना बेस्ट बॉलर, डॉ. प्रकाश कदम यांना बेस्ट फिल्डर आणि डॉ.केदार मोदळे यांना मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
      स्पर्धा शुभारंभ आणि बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी डॉ.जे.टी.पोळ,डॉ.प्रकाश कांबळे,डॉ. बिपीन शहा, डॉ.सुभाष दोशी,डॉ.संजय धुमाळ, डॉ. संजय राऊत, विवो डीस्ट्रीब्युटर सरगम दोशी, डॉ. देशपांडे, डॉ. अशोक व्होरा, फलटण डॉक्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोनवणे,सचिव डॉ निनाद दोशी, उपाध्यक्ष डॉ सागर माने, महिला उपाध्यक्षा डॉ. सौ संजीवनी राऊत,खजिनदार डॉ योगेश गांधी यांच्यासह शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.
 
Top