झोपडपट्टीवासीयांच्या मागण्यांसाठी दि.२० फेब्रुवारी रोजी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंचा मोर्चाकेंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंचा मोर्चा
रेल्वेच्या, संरक्षण मंत्रालयाच्या ,केंद्र सरकारच्या जमिनीवरील तसेच वन जमिनीवरील आणि टाटा पॉवरच्या विजवाहिनी खाली राहणाऱ्या झोपड पट्टीवासीयांच्या विविध मागण्यांसाठी
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वाजता बांद्रा येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे . दि.२० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या संविधान निवासस्थानापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.

याबाबतची माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे , रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे, सरचिटणीस रतन अस्वारे यांनी दिली आहे.
 
Top