ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर दुष्काळग्रस्तांचे धरणे आंदोलन
मुंबई - मराठवाडा,खान्देश, विदर्भ भागातील दुष्काळग्रस्तांनी आपल्या रोजीरोटीसाठी दुष्काळ ग्रस्त गाव आणि घरे सोडून मुंबई ठाणे महानगरात आश्रय घेतला आहे. त्या स्थलांतरीत बेघर दुष्काळ ग्रस्तांना ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शिरढोण, खुनी येथील गुरचरण जमिनीवर घरे द्यावीत किंवा घरकुल योजनेद्वारे घरे द्यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वात स्थलांतरीत दुष्काळग्रस्तांचे  प्रचंड धरणे आंदोलन सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता  ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. 

स्थलांतरित बेघर दुष्काळग्रस्त ,भाडेकरू रहिवासी यांना ठाणे जिल्ह्यात घरे मिळवीत या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भ, खान्देश नागरी सेवा संघ या ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष धनराज थोरात ,सचिव सुंदर खाडे यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठया संख्यने बेघर दुष्काग्रस्त नागरिक उपस्थित होते. बेघर दुष्काळग्रस्तांच्या घरासाठी पुढील आंदोलन येत्या दि.२४ फेब्रुवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी धनराज थोरात यांनी केली.              
 
Top