जयसिंगपूर,- मानवतेच्या भावनेतून प्रलंयकारी महापूरासारख्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी धावून जाणाऱ्या व मदत, बचाव, सेवा, स्वच्छता कार्याच्या माध्यमातून जन्यसामान्यांची सेवा करणाऱ्या वीर सेवा दलाचे सेवा कार्य हे आदर्शवत आहे. त्यांच्या कृतीने ४१ वर्षापूर्वी स्व.डॉ.गुंडे, स्व.डॉ.एन.जे.पाटील व वीराचार्यांचा कार्य वारसा जपल्याची जाणीव झाली.वीर सेवादल वृक्षारोपण, जलसंवर्धन या राष्ट्रीय कार्याप्रमाणेच संस्कार संवर्धनाचे कार्य करीत आहे आहे,असे मत आरोग्य,सांस्कृतिक,औषध व प्रशासन राज्यमंत्री ना.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. ते वीर सेवा दल आयोजित महापूर काळात मदत, सेवा,स्वच्छता केलेल्या वीर सेवा दल शाखांच्या सन्मानाप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी.ए.पाटील होते .याप्रसंगी द.भा.जैन सभेचे अरविंद मजलेकर, सागर चौगुले,राजेंद्र झेले,दादासोा पाटील,कर्मवीर मल्टिस्टेटचे भाऊसो पाटील , रमेश पाटील, वीराचार्य पतसंस्थेचे जयकुमार बेले, शांतिसागर पतसंस्थेचे बाळासो पाटील उपस्थित होते.     
    प्रलयकारी महापूरप्रसंगी मदत,सेवा,बचाव, स्वच्छता कार्य करणाऱ्या ५० हून अधिक वीर सेवा दल शाखांचा गौरव सन्मान करण्यात आला. 
 या कार्यक्रमाचे स्वागत मुख्य संघटक सुभाष मगदूम यांनी केले. वीर सेवा दलाचे चेअरमन  शशिकांत राजोबा यांनी प्रास्ताविक केले.प्रतिमा पूजानाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी राज्य मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ना.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा वीर सेवा दलाच्या वतीने अध्यक्ष शशिकांत राजोबा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 
 अध्यक्षीय भाषणात प्रा.डी.ए.पाटील यांनी वीर सेवा दलाचे सामाजिक कार्य मोठे असून संघटनेने केलेल्या मागीतुंगी,श्रवणबेळगोळ येथील ऐतिहासिक सेवा कार्याचा दाखला दिला.  कार्यक्रमाचे आभार सेक्रेटरी एन.जे.पाटील यांनी मानले . सूत्रसंचलन कुबेर शेडबाळे, राजकुमार चौगुले, सचिन उपाध्ये यांनी केले. 
  या कार्यक्रमासाठी वीर सेवा दल पदाधिकारी, मध्यवर्ती सदस्य, प्रांतिय, जिल्हा, तालुका ,शाखा सदस्य व  परिवार उपस्थित होते.
 
Top