पंढरपूर - दिनांक ३ फेब्रुवारी २०२० रोजी निनावी तक्रार अर्जाद्वारे चाइल्ड वेल्फेअर कमिटी यांच्या मार्फतीने चळे , तालुका- पंढरपूर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याबाबत अर्ज प्राप्त झाल्याने निर्भया पथक, पंढरपूर व चाइल्ड वेल्फेअर कमिटी, सोलापूर यांच्या संयुक्त कारवाईमध्ये अगदी सुनिश्चित वेळी दिनांक ०४/०२/२०२० रोजी ११:५५ चा मुहूर्त साधला जायच्या आधी दोन्ही पथके पोहचून अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबतची माहिती देऊन बालविवाह यशस्वीपणे रोखला. सदर बाबत चाइल्ड वेल्फेअर कमिटी सोलापूरच्या अध्यक्षा यांचे समक्ष सदर मुलीस व तिचे पालकांना हजर केले आहे .
याबाबत बोलताना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही यशस्वीपणे बंद करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच पंढरपूर उपविभाग यामध्ये अशा प्रकारचा बालविवाह अथवा महिला विषयीच्या अत्याचार अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दल सदैव दक्ष व तत्पर आहे.
 हि कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.  सागर कवडे तसेच पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे पो.उप नि. गाडेकर ,पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
 
Top