पंढरपूर -पंढरपूर नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षते खाली मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते व पाणीपुरवठा समिती सभापती गुरूदास अभ्यंकर,बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, शिक्षण समिती सभापती रेणुका घोडके, नगरसेवक डी.राज सर्वगोड, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगर अभियंता नेताजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना ८० जामर देण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सांगितले की, पंढरपूर शहर भारताची दक्षिण काशी समजली जाते. श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी संपुर्ण भारतातुन मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे शहरातील असणारी लोकसंख्या व यात्रेकरुंची वाहने यामुळे शहरातील वाहतुक व पार्किंग व्यवस्थेवर परिणाम होवून शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांना व्यापा-यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांनी पोलीस प्रशासन व नगरपरिषद यांची वाहतुक व पार्किंग व्यवस्थेबाबत चर्चा करून रस्त्यावर अतिक्रमण करून उभा राहणा-या वाहनावर आळा बसविण्यासाठी जामर देण्या बाबत सुचना दिल्या होत्या. कारण येणारे भाविक सदरची वाहने पार्किंगच्या ठिकाणी न लावता, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्गावर वाहने लावुन दर्शनाला जात असल्याने या रस्तावर असलेल्या दुकानदारांना वाहने दुकाना समोर लावल्याने त्रास होत असल्याने संबंधीत व्यापा-यांनी नगरपरिषदे कडे व आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या म्हणून पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांना ८० जामर देण्यात आले. 
  यावेळी अभियंता अतुल केंद्रे,सद्दाम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, नितीन गांधी उपस्थित होते.  
 
Top