सोलापूर - सोलापूरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असून संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक आहेत. इतर आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी उपसभापती- विधानपरिषद,ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
पुढे बोलताना ना.डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीच्या चौकशीतून समोर आल्याचे समजते.
त्यामुळे या पत्राच्या माध्यमातून या घटनेच्या निमित्ताने सूचना करते की, १. फरार आरोपींना तंत्रज्ञानाचा उपयोग करून तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना जामीन मिळणार नाही याची दक्षता पोलीस अधिकाऱ्यांना घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
२. पिडीत मुलीला मनोधैर्य योजने अंतर्गत १५ दिवसाच्या आत मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.
३. कोर्टात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त यांना सूचना देण्यात यावे.
४. पिडीत मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यांनुसार संरक्षण देण्यात यावे असे आवाहन ना.सतेज पाटील,राज्यमंत्री गृह (शहरे),मंत्रालय, मुंबई यांना विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
यांनी केले आहे.
वारंवार अशा घटनां घडत आहेत . यापूर्वीही सोलापूर जिल्ह्यात या प्रकारची घडली होती . पुढे सर्व शांत झाले.या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 
Top